श्रीदेवी ही माइया काॅलेजच्या जीवनातील मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुटूंबिय व चाहते दुःखातून अजून सावरत नाहीत, तोपर्यंतच समाजमाध्यमांतवर तिचा मृत्यू का झाला याबद्दलच्या विकृत तर्काचे मोहोळ उठले. त्यामध्ये या गुणी अभिनेत्रीच्या गुणाचे मूल्यामापन करणारे व आठवणीचे कढ काढणारे लेखन अक्षरश: वाहून गेले. व्हाटसअॅप विद्यापीठातल्या पदवीधरांनी वजन कमी करणे, सौंदर्य उपचार कसे घातक आहेत, व नैसर्गिक जीवनशैली कशी चांगली यावर प्रवचने सुरू केली.